Tuesday, October 21, 2008

नाचे म्हातारा

घेर कळेना, ढेर कळेना
बम्ब नाचायाचे याला
अरे कुणीतरी थांबवा
या माझ्या म्हातारयाला
ओ माझ्या म्हातारयाला ।

नाच नाचूनी पाय थकले
झिजलेले गुडघे सुजले
आणखी तरी नाचायाचे
या माझ्या म्हातारयाला
ओ माझ्या म्हातारयाला ।

झुकले जरी याचे तन
मस्त आहे हिरवे मन
त्याची ही हिरवी धुंदी
या माझ्या म्हातारयाला
ओ माझ्या म्हातारयाला ।

हरले तन जिंकले मन
थकलेले उथले मन
वाजवू किती तालया
या माझ्या म्हातारयाला
ओ माझ्या म्हातारयाला ।






No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...