Monday, October 13, 2008

दंगल वि. दंगल - प्रताप रामराव बोर्डे

Poem by Pratap Ramrao Borde, Pashan Road, Pune
Published in 'Muktapeeth' edition of the daily 'Sakal'
Reporduced here without permission:

Title: दंगल X दंगल

एक भित्तिपत्रक फाडलं, दंगल उसळली
नऊ ठार नव्वद जखमी, चौकशी सुरू झाली
एक शेळी पकडून आणली, तिनं फाडलं होतं
हे भिन्तीपत्रक
शेळीला विचारल, 'बोल तू हिंदू की
मुसलमान?'
शेळीनं जबाब दिला,
'जन्मले हिन्दूच्या घरी, पोसले मुस्लिमाने।'
पोलिसांनी विचारले,
'तू निधर्मी आहेस तर भिन्तिपत्रक का
फाडले?'
शेली म्हणाली,
'भूक लागली होती, कारण मीही आहे
दारीदरया रेशेखाली,
शासनाने मला शेतीच्या जोड़धंद्यात टाकले
तेव्हापासून !'
पोलिस म्हणाले, 'पण असे दुसर्याचे
भिन्तीपत्रक खाने गुन्हा आहे,'
शेली म्हणाली, 'मी अशिक्षित आहे, भुकेपोती
खाल्ले। तुम्ही तर चैनीसाठी लाच घेता'
पोलिस म्हणाले, 'गरीब असून चराचरा
बोलते। कास्टदीताच कापून खाऊन
निकाल लावू हिचा!'

पोलिसांनीच कायदा हातात घेतला, पुन्हा
दंगल उसलाली!

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...