Wednesday, October 29, 2008

खुलली कळी

थकूलं मन हळूच
कळीत जावून लपलं
सूर्यासवे उमलायची
वाट पाहू लागलं

सूर्य आला वर तरी
कळी काही उमलेना
किती केली आर्जवं तरी
फूल काही फुलेचना

तिकडून आला माळी
घातलं ख़त पाणी
खूप घातल्या शिव्या अन्
खोचक टीका टिप्पणी

शिव्या खूप बोचल्या
टीका खोल रुतली
कळी अशी घाबरली
घट्ट मिटून लपली

मनाने मनावर घेतलं
भ्रमरावर सवार झालं
कळीच्या मनात शिरलं
अलवार तिला थोपटीलं

खुदकन कळी खुलली
अंगांग रोमांचली
हात पसरून नाचली
फूल होऊन बहरली

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...