Monday, November 3, 2008

एकच ना

Marathi poem 'Ekach Naa' by Ganesh S. Bhakare published in Mauj diwali, 08 issue. Reproduced here without permission.

कवी : गणेश भाकरे

झालो परदेशी
घासासाठी फ़क्त,
तुझ माझ रक्त
एकच ना!
बोलणारी बोली
जराशी वेगळी,
तुझी माझी झोळी
एकच ना!
पोटासाठी आम्ही
सोडल रे गाव,
पोटाचा स्वभाव
एकच ना!
करू नको गड्या
असा माझा द्वेष,
तुझा माजा देश
एकच ना!
गाळूनिया घाम
भरतो रे पोट,
जगण्याची गोठ
एकच ना!
आम्ही काय केलं
असं गड्या पाप,
तुला वाटे शाप
एकच ना!
असं कसं म्हणू
मला परप्रान्ती,
पोटाची भ्रमंती
एकच ना!



No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...