Saturday, November 15, 2008

कर्णभाष

कातर त्या पहाटे
आतूर या कानांत
कशी कळत नकळत
होई हळवी कुजबूज,
लाडीक गोड पापे
किती लाघवी दातांचे,
रोमांची खोल चावे
कोमल सालस ओठांचे.

आतूर अशा पहाटे
थंडीचे बाळ मिश्किल
ओठांची करून चुंबळ
बाहेर खुणावत राही.
जावे का बाहेर
गुलाबी बाळास भेटाया
का रहावे असेच
कर्णभाष कराया


No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...