Tuesday, November 4, 2008

चिमाणीचा पापा

एक चिमणी आली
दाणा देवून गेली,
एक चिमणी आली
पाणी ठेवून गेली,
एक चिमणी आली
काडी शिवून गेली,
एक चिमणी आली
मेण लिम्पून गेली,
एक चिमणी आली
बी पेरून गेली।

मी ते बी रुजवलं
ख़तपाणी घालून फ़ुलवलं
फळाफुलांनी सजवलं,
चिऊकाऊन्नी गजबजलं।

तिच्या काडीची सुंदर घरटी बांधली,
तिच्या मेणाने ती सुंदर लिम्पली,
फळंफूलं त्यात भरभरून भरली,
इवल्या इवाल्यान्नी चिवचिवली।

एक चिमणी येते
माझ्या कानात चिवडते
एक चिमणी येते
छान काम म्हणते,
एक चिमणी येते
दूर झाडं दाखवते,
एक चिमणी येते
पापा घेऊन जाते.

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...