आतून येतो स्वस्त सेंटसकटचा उग्र दर्प
खिडकीतून बाहेर सतत तिरके कटाक्ष
गजांतून खुणावणारे हात व उन्नत उरोज
अवेळी दिले जाणारे आळोखे पिळोखे
वक्षांना दिलेली नकळत कळत थरथर
कधी गाठ सुटलेली अर्धीशी काचोळी
किंवा कच्च बांधलेला उघडा पदर
रस्त्यावर अशा अनेक जुन्या खिडक्या
बाहेर पिढ्यांपिढ्या फ़ेऱ्या मारतो मी
राकट मिशांना तूप लावून दिलेला पीळ
सदऱ्याची उघडी बटणे, पुढे काढलेली छाती
सिंहाला असते आयाळ तशी पुरुषाची छाती
हातात गजरे न कडी, आणि मांडीत बेडक्या
ही नजर निवडयची की ती छाती झेलायची
खिशात असता पॆसे मी असतो राजा
विकणारी करते धंदा आणि मी काय करतो
पॆसे देऊन मी काय फ़ार उपकार करतो
भीक नाही मागत, काहीतरी विकतेच ना
विकत घेतल्याशिवाय काय धंदा पूर्ण होतो
बाजार मांडणाऱ्या कंपन्या मार्केटींग करतात
बाजारातल्या बायका मात्र ’धंदा’ करतात
विकणारीची आम्हाला अती घृणा वाटते
विकत घेऊन मी मात्र ताठ मानेने मिरवतो.
No comments:
Post a Comment