Wednesday, November 12, 2008

ओरखडे

आपल्या मनावर उठणारे ओरखडे हे रेघेसारखे असावेत. पाण्यावरची रेघ किंवा वाळूवरची रेघ! पण दगडावरची रेघ मात्र नको की जी पुसलीच जात नाही. मनावर उठलेले दुःखाचे ओरखडे हळूवार पुसले जावेत. कायमचे कोरले जाऊ नयेत. आनंदाची, ममतेची, प्रेमाची, किंवा अगदी विस्मरणाचिही फ़ुंकर त्यावर मारावी आणि पुन्हा मन स्वछ करावे. 

आपण दुःखाच्या लगोऱ्या जमवत राहून त्यांची एक भिंतच बांधतो, आपल्या ्चारही बाजूंनी. आणि दुःखाच्या त्या दगडांमध्ये लिंपायला आपण आपले आनंद वापरून घालवून बसतो. कदा्चित हे नैसर्गिकही असेल. कारणं काहीही असोत पण होते ते असे आणि आपण ते बदलू शकतो. दुःखाचे दगड, दुःखाच्या रेषा विरघळवून, पुसून टाकायच्या. आनंदाचे कण जमवत जमवत त्यांचे एक सुन्दर वाळूचे पेटिंग करायचे. 

थेंबे थेंबे तळे साचते. हे तळे गटाराच्या पाण्याने भरलेले दुर्वासी असावे कि निळेशार सुंदर असावे ते आपल्याच हातात असते. हे तळे स्वछ निळे हलते खेळते ठेवा आणि बघा मग किती सुन्दर सुन्दर पक्षी, मासे आपल्या मनाभोवती उडतात, आपल्या मनाला गोड लुचतात ते.

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...