Wednesday, November 12, 2008

स्वप्न

एक रात्र अजूनी स्वप्नाची वाट पहाते
एक स्वप्न अजूनी रात्रीची वाट पहातं

एक प्रिया कुठूनी माझीच वाट पहाते
मी असा इथूनी तिचीच वाट पहातो

वाटेवरती असाच वाट पहात रहातो
स्वप्नाळल्या वाटेची वाट पहात रहातो

रात्र संपून जाते, जाग येऊन जाते
तरी मी तसाच स्वप्नं बघत रहातो

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...