Sunday, November 2, 2008

व्हेन्डिंग मशीन

त्या रात्रीही ती रोजच्यासारखीच
पाय फाकवून झोपली होती
कोणीही या, फटीत नाणं टाका,
गचगच करा नि पाहिजे ते मिळवा
व्हेंडींग मशिनाला काय त्याचं

माझी मात्र ती पहिलीच वेळ होती।
दाटून आली होती
अनामिक भीती नि नवागत थरथर ।
तरुण भावनांचा उमलायाचा क्षण
हलूवार अलगद फूंकर मारल्यासारखा।

समोर पडला होता मांसाचा गोळा
अनावृत्त, मांसल, सुडौल, मृत
फूलपाखाराला मिळाली पत्थराची साथ
एक झांज वाजली मातीच्या गोळयावर
तेवू पाहणारी ज्योत पडली बर्फात जाऊन

माझ्या त्या नाजुक सुंदर ज्योतीचे
आयुष्य कसे तेवले माहीत नाही
मेणबत्ती मात्र वितळून जागीच
झाली मेणाचा गोळा
अनाकार, भावहीन, प्राणहीन, अर्थहीन






No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...