Monday, November 3, 2008

तू झालो

एक अन्धुकश्या संध्याकाळी

माझा मीच बसलो होतो

रात्र उजाडण्याची वाट पहात

तुझ्या येण्याची वाट पहात



तू आलीस -

चमचमत्या तारयांचे

छनछानते पैंजन घालून,

ाळयाशार आभाळाची

लख्ख शाल पांघरून,

आसमंत दरवळीची
मनभर संगत घेऊन,
प्रतिपदेच्या चंद्राची
आशापालावी होवून,
अनंत विश्वाची शून्यता
अलगद माझ्यात भरून,
अशी आल्यावर स्वतःच
होत्याची नव्हती होवून।

माझा मीच राहिलो नाही
इतका तू झालो.




No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...