Wednesday, November 12, 2008

रेशीमस्पर्श

रेशमाचा
रेशमी स्पर्श
माझा तुला
तुझा मला.

मऊसूत रेशमाचे
गुंते होतात तरी कसे?
गाठी पडतात अशा कशा?

रेशमाचेच फ़ास
मग ते मजबूत असणारच

रेशीमगाठी
सोडवण्यासाठी
हवेत हात
तसेच खास

जे गाठींच्या आत जाऊन
अलगद गुंता सोडवतील


No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...