अशाच पद्धतीने अनेक गोष्टी आप्ल्याला दिसतात. शिल्पकार दगडाला टोचे मारमारून, पॆलू पाडून त्यापासून सुंदर शिल्प घडवतो. आई अनेकदा आपल्या मुलाला रागावून शिक्षा करकरून त्य़ला उत्तम माणूस बनवायचा प्रयत्न करते.
असेच अनेकदा माझेही होते. मला माहितीये माझे मन. असेच नितळ सुंदर आहे आतून. पण त्यावर आवरणंच्या आवरणं चढली आहेत. ती बाजूला करणेही असेच त्रासदायक आहे. अंग सोलवटून निघते, डोळ्यांतून धारा वहायला लागतात. शेवटी कंटाळा येतो तरी आवरणं संपत नाहीत.
द्रॊपदीला किती सोसायला लागलं! त्यानंतर सर्व जनांचं खरं रूप स्पष्ट झालं. माझंही तसच होईल का? होईल का माझं रूप स्पष्ट? उघडं करण्यापेक्षा उघडं व्हायला जास्त हिंमत लागते. उघडं होताना नागडं व्हायची भिती सगळ्यात जास्त असते.
येईल ना कृष्ण माझी पाठराखण करायला?
No comments:
Post a Comment